प्रस्ताव दाखल करा

बी द चेंज फाउंडेशन आयोजित
राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६

शिक्षण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळेच समाज व राष्ट्राचा विकास होतो. शिक्षक हा नागरिकांचे जीवन समृद्ध करण्यासाठी व देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावणारे उत्तम नागरिक घडवण्यासाठी मुलभूत स्वरूपाचे प्रयत्न करत असतो. इतर व्यवसायांमधून निवृत्त झाल्यानंतर व्यक्तींना "माजी" म्हणून संबोधले जाते, तर शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्यांच्या हृदयात चिरंतन "माझे शिक्षक" राहतात. हा फरक आपल्या समाजातील शिक्षकांचे अतुलनीय महत्त्व अधोरेखित करतो. पुढील काळात जगाचे नेतृत्व आजच्या आपल्या विद्यार्थ्यांनी केले पाहिजे त्यासाठी आपल्याला त्यांना सक्षम बनवायचे आहे. आणि त्यांना सक्षम बनवायचे काम हे राज्यातील अनेक गुणवंत, होतकरू व उपक्रमशील शिक्षक सेवाभावी वृत्तीने करत आहेत. अशा समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी शासनाच्या विविध विभागाद्वारे व स्वयंसेवी संस्थांद्वारे आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविले जाते. परंतु अनेक मेहनती, होतकरू व उपक्रमशील शिक्षक अशा पुरस्कारांपासून वंचित राहतात व त्यांचे कार्य समाजापर्यंत पोचत नाही. अशा शिक्षकांना ओळखून त्यांचा सन्मान करण्याच्या उदात्त हेतूने या "बी द चेंज फाउंडेशन द्वारा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६" चे आयोजन करण्यात येत आहे. संपूर्ण राज्यातून प्रस्ताव मागवून शिक्षकांची "राज्य आदर्श शिक्षक" म्हणून निवड करण्यात येईल. तसेच या पुरस्कारांव्यतिरिक्त उत्तेजनार्थ निवडक शाळांना शालेयउपयोगी डिजिटल साहित्य देणगी स्वरुपात देण्यात येईल. आजच आपला प्रस्ताव दाखल करा.

राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६ महत्वाच्या लिंक्स

JEE Main + Advanced
माहितीपत्रक डाऊनलोड करा
Click Here
JEE Main
ऑनलाईन प्रस्ताव दाखल करा
Click Here
JEE Main + Advanced
हमीपत्र
Click Here
NEET-UG
नामनिर्देशन शुल्क भरा
Click Here
राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६

राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६

मुंबई · १८ जानेवारी २०२६

राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६ सोहळा उत्साहात संपन्न बी द चेंज फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६ सोहळा रविवार, १८ जानेवारी २०२६ रोजी मुंबई येथील आरंभ हॉलमध्ये अत्यंत उत्साह आणि थाटामाटात पार पडला. शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी शिक्षकांचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या राष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षणतज्ज्ञ तसेच मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते.

या सोहळ्यात देशातील विविध राज्यांमधील गुणवंत, समर्पित व सामाजिकदृष्ट्या बांधील असलेल्या शिक्षकांचा त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक योगदानासाठी सन्मान करण्यात आला. सर्वांगीण विद्यार्थी विकास, नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि सामाजिक कल्याणासाठी राबवलेल्या उपक्रमांद्वारे या शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

बी द चेंज फाउंडेशनच्या या उपक्रमामागील उद्देश शिक्षकांच्या कार्याची दखल घेणे, त्यांना प्रोत्साहन देणे आणि समाजात शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणे हा असल्याचे आयोजकांनी सांगितले. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा कार्यक्रमांमुळे शिक्षकांचा सन्मान व प्रतिष्ठा वाढून शिक्षण क्षेत्र अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला.

अधिक माहिती

राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६ वैशिष्ट्ये

JEE Main + Advanced
पुरस्कार विजेत्यांची पारदर्शक निवड प्रक्रिया
JEE Main
आलेल्या सर्व प्रस्तावांचे डिजिटल रेकॉर्ड मेंटेनन्स
NEET-UG
ऑनलाईन पद्धतीने प्रस्ताव दाखल सुविधा
Pre-Nurture and Career Foundation
ऑफलाईन पद्धतीने ही प्रस्ताव दाखल सुविधा
JEE Main + Advanced
रु. ५०००/- मात्र नामनिर्देशन शुल्क
JEE Main
संपूर्ण राज्यातून अनेक शिक्षक विजेते निवडले जाणार
NEET-UG
शैक्षणिक क्षेत्रातील राज्यातील एक नावाजलेली संस्था
Pre-Nurture and Career Foundation
पुरस्कार सोहळ्याला सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

प्रस्तावासाठी महत्वाच्या आवश्यक अटी व शर्ती

महाराष्ट्र राज्यातील मान्यताप्राप्त शाळेत (प्राथमिक, माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक) शिक्षक म्हणून सेवेत असावा.

मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यमाच्या कोणत्याही सरकारी, निमसरकारी, खाजगी, स्थानिक स्वराज संस्था यांच्या शाळांमध्ये सेवेत असलेले शिक्षक प्रस्ताव दाखल करण्यासाठी पात्र आहेत.

स्टेट बोर्ड, सी. बी. एस. ई. व आय. सी. यस. ई बोर्डाच्या शाळांतील शिक्षक प्रस्ताव दाखल करण्यास पात्र आहेत.

शिक्षक एकूण सेवा किमान १ वर्षे आवश्यक.

शिक्षक निर्व्यसनी असावेत अंतिम निवड यादी जाहीर करतांना तज्ञ समितीमार्फत शिक्षक ज्या शाळेत कार्यरत आहे त्या शाळेच्या व्यवस्थापनाशी संपर्क करून या गोष्टीची खातरजमा केली जाईल.

शिक्षकांनी खाजगी शिकवणीत सहभागी होऊ नये.

पूर्व प्राथमिक शाळा शिक्षक प्रस्ताव दाखल करण्यास पात्र आहेत

प्रस्ताव दाखल करत असतांना शिक्षकांनी दिलेली माहिती व पुरावे हे चुकीची अथवा दिशाभूल करणारी नसावी.

प्रस्ताव दाखल करणाऱ्या शिक्षकांची कसल्याही प्रकारची विभागीय चौकशी सुरु नसावी

कोणत्याही कारणास्तव निलंबित असलेले शिक्षक प्रस्ताव दाखल करण्यास पात्र नाहीत

शाळेला UDISE Code असणे आवश्यक. मान्यता नसलेल्या शाळा. खाजगी शिकवणी वर्गातील शिक्षक. खाजगी ऑनलाईन पोर्टल अथवा वेबसाईट वर अध्यापन करणाऱ्या व्यक्ती, पूर्व प्राथमिक शाळा शिक्षक प्रस्ताव दाखल करण्यास पात्र नाहीत.

नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग अंतर्गत सुरु असणाऱ्या स्पेशल स्कूल्स मध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असणारे शिक्षक शाळेला UDISE Code नसेल तरीही प्रस्ताव दाखल करण्यास पात्र राहतील.

शिक्षकांनी नामनिर्देशनासाठी सादर केलेले पुरावे स्वयंसाक्षांकित करणे आवश्यक आहे.

निवड झालेल्या सर्व आदर्श शिक्षकांचे प्रस्तावातील माहिती व पुरावे हे शिक्षक ज्या शाळांत कार्यरत असतील त्या शाळांशी संपर्क करून खातरजमा करून घेतली जाईल

समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी शासनाच्या विविध विभागाद्वारे व स्वयंसेवी संस्थांद्वारे आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविले जाते. परंतु अनेक मेहनती, होतकरू व उपक्रमशील शिक्षक अशा पुरस्कारांपासून वंचित राहतात व त्यांचे कार्य समाजापर्यंत पोचत नाही. अशा शिक्षकांना ओळखून त्यांचा सन्मान करण्याच्या उदात्त हेतूने या “बी द चेंज फाउंडेशन द्वारा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६” चे आयोजन करण्यात येत आहे. त्यामुळे राज्य अथवा केंद्र शासनाचे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक तसेच जिल्हा परिषद, नगर पालिका महानगर पालिका पुरस्कार प्राप्त शिक्षक यांनी कृपया नामनिर्देशन प्रस्ताव दाखल करू नयेत. सदर शिक्षकांनी कृपया फोन व ईमेल द्वारे बी. द. चेंज फाउंडेशन ला संपर्क करून आपले बहुमूल्य मार्गदर्शन करावे.

राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार

दिनांक २९ जून २०२५ रोजी शिर्डी, महाराष्ट्र येथे आयोजित

या प्रतिष्ठित सोहळ्यात आदर्श शिक्षकांच्या उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यात आला असून राज्यभरातील १३०० हून अधिक शिक्षकांची या कार्यक्रमास उपस्थिती लाभली.


क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले

राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान समारंभ

हा व्हिडिओ माहितीस्तव म्हणून पहावा! अशाच पद्धतीचा भव्यदिव्य राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा २०२६ घेण्याचा आपल्या संस्थेचा मानस आहे
शिक्षक पुरस्कार सोहळ

राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार

१८ जानेवारी २०२६

दिनांक : १८ जानेवारी २०२६

बी दि चेंज फाउंडेशन यांच्या वतीने मुंबई येथे राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा २०२६ अत्यंत यशस्वी व दिमाखदार पद्धतीने आयोजित करण्यात आला. या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार सोहळ्याचा मुख्य उद्देश देशभरातील आदर्श, गुणवंत व कर्तृत्ववान शिक्षकांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा सन्मान करणे हा होता.

या पुरस्कार सोहळ्यास भारतातील विविध राज्यांमधील शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते तसेच मान्यवर पाहुण्यांची लक्षणीय उपस्थिती लाभली. शिक्षकांच्या राष्ट्रनिर्मितीतील अमूल्य योगदानाचा गौरव करणारा हा उपक्रम शिक्षण क्षेत्रात प्रेरणादायी ठरला.

राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६ प्रस्तावासाठी आवश्यक निकष

शैक्षणिक संशोधनपर निबंध / प्रबंध यास प्राप्त पुरस्कार व सादरीकरण

वृतपत्र अथवा प्रथितयश नियतकालिकात प्रकाशित लेख (वैचारिक किंवा विश्लेषणात्मक)

शिक्षक शिकवत असलेल्या वर्गातील त्या त्या अध्यापन विषयाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांस विविध क्षेत्रातील प्राप्त पुरस्कार कला, क्रीडा, संगीत, नृत्य, भाषा, गणित, सामाजिक शास्त्र, स्काऊट गाईड, चित्रकला, खेळ, वकृत्व इ

शिक्षक निर्व्यसनी असावेत अंतिम निवड यादी जाहीर करतांना तज्ञ समितीमार्फत शिक्षक ज्या शाळेत कार्यरत आहे त्या शाळेच्या व्यवस्थापनाशी संपर्क करून या गोष्टीची खातरजमा केली जाईल.

शिक्षकाने केलेले सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रातील कार्य तसेच आपत्ती व्यवस्थापन, राष्ट्रीय कार्य इ

राज्य शासनाकडे अधिकृत नोंदणी असलेल्या इतर स्वयंसेवी संस्थेकडून प्राप्त पुरस्कार

शिक्षकाने शाळेच्या उन्नतीसाठी समाजाकडून मिळवलेले योगदान डिजिटल साहित्य इ.

प्रशिक्षणात तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केलेले असल्यास विविध स्तरावर

विद्यार्थ्यांच्या प्रज्ञेच्या शोध घेणाऱ्या परीक्षेतील वर्गातील एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शेकडा प्रमाण

शैक्षणिक क्षेत्राला व गुणवत्तेला स्वतःच्या नवप्रकल्पाद्वारे दिशा देणारे कार्य ज्ञानरचनावाद, डिजिटल स्कूल, इ. साहित्यनिर्मिती, वाचनप्रेरणा व इतर नवोपक्रम

शैक्षणिक स्पर्धातील विद्यार्थ्यांचा सहभाग विज्ञान प्रदर्शन, कला, क्रीडा स्पर्धा, साहित्य स्पर्धा, इन्स्पायर अवार्ड, कृती संशोधन

शिक्षकांनी स्वतःची कौशल्ये सुधारण्यासाठी वैयक्तिकरित्या केलेले इतर कोणतेही प्रयत्न

आनंददायी शिक्षणासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर

विद्यार्थ्यांवर अध्यापनाचा अधिक चांगला परिणाम व्हावा यासाठी शिक्षकाने अवलंबलेल्या सर्जनशील पद्धती इत्यादी उदा. कथा-कथन, कला, खेळ, उदाहरणे इ.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वर्गाच्या भिंतींच्या पलीकडे जाऊन मार्गदर्शन करणे.

पोषण, स्वच्छतागृह, बालविवाह, वंचित मुलांचे उत्थान इत्यादी सामाजिकदृष्ट्या संवेदनशील विषयांबाबत मुलांमध्ये सामाजिक जागरूकता पसरवण्यासाठी शिक्षकांनी केलेले कार्य.

राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६ विषयी नेहमी विचारले जाणारे प्रश्न

Ans.राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६ चे आयोजन राज्यातील शैक्षणिक क्षेत्रातील एक नावाजलेली संस्था "बी द चेंज फाउंडेशन" करत आहे

Ans.प्रस्ताव ऑनलाइन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने दाखल करता येईल! याच वेबसाईट वर राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६ महत्वाच्या लिंक्स या सेक्शन मध्ये माहितीपत्रक डाऊनलोड करा या लिंक वर क्लिक केल्यास पीडीएफ स्वरूपात माहितीपत्रक डाऊनलोड होईल त्यात ऑफलाईन अर्जाचा नमूना आहे तेवढे पेजेस प्रिंट करून त्यावर पेनाने माहिती भरून सोबत आवश्यकत ती कागदपत्रे जोडून संस्थेचा ईमेल आय डी shikshakpuraskar2025@gmail.com वर ईमेल करावा!
अथवा याच सेक्शन मध्ये ऑनलाईन प्रस्ताव दाखल करा या लिंक वर क्लिक केल्यास एक स्वतंत्र फॉर्म ओपन होईल! या फॉर्म मध्ये सर्व माहिती भरण्याचे पर्याय आहेत तसेच आपण पीडीएफ स्वरूपात प्रस्ताव, फोटो, व्हिडिओ, वेबसाईट ब्लॉग लिंक्स, युट्यूब चॅनेल लिंक ई सर्व आपलोड करू शकता

Ans. प्रस्ताव दाखल करण्यासाठी नामनिर्देशन शुल्क रु ५०००/- इतके आहे

Ans. आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६ साठी ८७९६६९६९६० हा हेलपलाईन नंबर आहे व तो २४ तास सुरू असेल! आपल्या सर्व शंकांचे निरसन याद्वारे करण्यात येईल! आपण कोणताही संकोच न बाळगता या हेलपलाईन वर कॉल करावा ! आपणास इत्यंभूत माहिती देण्यात येईल.

Ans.महाराष्ट्र राज्यातील मराठी, इंग्रजी, हिन्दी व उर्दू माध्यमाच्या कोणत्याही सरकारी, निमसरकारी, खाजगी, स्थानिक स्वराज संस्था यांच्या शाळांमध्ये सेवेत असलेले शिक्षक प्रस्ताव दाखल करण्यासाठी पात्र आहेत.

Ans. होय ! अकरावी व त्यापुढील इतर सर्व अभ्यासक्रमांसाठी शिक्षक, प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले सर्व शिक्षक यांच्यासाठी वेगळा प्रवर्ग केला आहे! त्या विशिष्ट प्रवर्गात सदर शिक्षक प्रस्ताव दाखल करू शकतात! अधिक माहितीसाठी माहिती पत्रक डाऊनलोड करून सर्व माहिती व्यवस्थित वाचून घ्यावी!

Ans. होय ! नर्सरी ते सीनियर के जी (किण्डरगार्टन ) मध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या भगिनी यांच्यासाठी वेगळा प्रवर्ग केला आहे! त्या विशिष्ट प्रवर्गात सदर शिक्षिका प्रस्ताव दाखल करू शकतात! अधिक माहितीसाठी माहिती पत्रक डाऊनलोड करून सर्व माहिती व्यवस्थित वाचून घ्यावी!

Ans.आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६ साठी नामनिर्देशन शुल्क भरण्यासाठी अंतिम दिनांक १५ जानेवारी २०२६ आहे

Ans.नामनिर्देशन शुल्क भरलेल्या शिक्षकांनी आपले प्रस्ताव ऑनलाईन अथवा पीडीएफ स्वरूपात ईमेल वर अथवा वेबसाईट वरील फॉर्म भरुन पाठविणेसाठी अंतिम दिनांक २० जानेवारी २०२६ आहे ! यानंतर आलेले प्रस्ताव ग्राह्य धरण्यात येणार नाहीत!

Ans.बी. द. चेंज फाउंडेशन द्वारा गठित कमिटी द्वारे आलेल्या प्रस्तावांची छाननी केली जाईल ( ज्यात सेवानिवृत शिक्षण अधिकारी असतील) नॉमिनेशन फी भरलेल्या शिक्षकांचे प्रस्ताव छाननी करणे साठी अंतिम दिनांक २१ जानेवारी २०२६ आहे !

Ans.२७ जानेवारी २०२६ या तारखेला याच वेबसाईट वर तसेच WhatsApp, ईमेल व एसएमएस द्वारे विविध प्रवर्गातील पुरस्कारासाठी पात्र ठरलेल्या सर्व शिक्षकांना पुरस्कार सोहळ्यासंदर्भात विस्तृत स्वरूपात माहिती देण्यात येईल!

Ans.पुरस्कार सोहळा हा १ फेब्रुवारी २०२६, शिर्डी येथे एका भव्य मैदानावर होणार आहे व या सोहळ्यास अहमदनगर जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित असतील.

राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार


उपस्थित राहणार असणारे मान्यवर

राज्यस्तरावरील आदर्श असलेले सामाजिक, शैक्षणिक व अधिकारी वर्गातील मान्यवर

राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५ – वृत्तपत्र दृष्यचित्रं

Paper Cut 1 Paper Cut 2 Paper Cut 3 Paper Cut 4 Paper Cut 5 Paper Cut 6 Paper Cut 7 Paper Cut 8 Paper Cut 9 Paper Cut 10 Paper Cut 11

राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५ – वृत्तपत्र दृष्यचित्रं

Paper Cut 1 Paper Cut 2 Paper Cut 3 Paper Cut 4 Paper Cut 5 Paper Cut 6 Paper Cut 7 Paper Cut 8 Paper Cut 9 Paper Cut 10 Paper Cut 11 Paper Cut 12 Paper Cut 13

राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार – १८ जानेवारी २०२६ - वृत्तपत्र दृष्टीचित्र

Paper Cut 1 Paper Cut 2 Paper Cut 4 Paper Cut 5 Paper Cut 6 Paper Cut 7 Paper Cut 8 Paper Cut 3

राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५


आयोजक मंडळ

मा. मयूर ढोकचौळे सर
अध्यक्ष

मा. मयूर ढोकचौळे सर

अध्यक्ष, राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार २०२6

अध्यक्ष, बी द चेंज फाउंडेशन

संचालक, स्केलझेन टेक्नॉलॉजी'ज प्रायव्हेट लिमिटेड

https://scalezen.in/

मयूर ढोकचोळे हे Scalezen Technologies Private Limited या शैक्षणिक सल्लागार कंपनीचे संस्थापक आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व आहेत. शिक्षण क्षेत्रात त्यांचा प्रचंड अनुभव असून, त्यांनी CBSE शाळा, इंग्रजी माध्यम शाळा आणि NDA अकॅडमीमध्ये पाच वर्षे प्राचार्य म्हणून यशस्वी कारकीर्द बजावली आहे.

फक्त एका संस्थेपुरते मर्यादित न राहता, ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचावे या उद्देशाने त्यांनी Scalezen Technologies Pvt. Ltd. ची स्थापना केली. या कंपनीमार्फत ते विविध शाळा, कॉलेजेस आणि NDA/NEET/JEE अकॅडमीसाठी शैक्षणिक व प्रशासकीय मार्गदर्शन, व्यवस्थापन सुलभीकरण आणि टेक्नॉलॉजी सोल्युशन्स देत आहेत.

ScaleZen ही कंपनी सध्या शाळा, कॉलेजेस, इंजिनिअरिंग आणि मेडिकल महाविद्यालये अशा विविध प्रकारच्या ३० पेक्षा जास्त शैक्षणिक संस्थांमध्ये आपली कन्सल्टन्सी सेवा पुरवत आहे. या सर्व संस्थांमध्ये ScaleZen कंपनी अकॅडेमिक, ऍडमिनीट्रेशन, डिजिटल मार्केटिंग, ब्रँडिंग, अ‍ॅडमिशन कन्सल्टन्सी, शैक्षणिक धोरण आखणी आणि व्यवस्थापन या क्षेत्रात सल्ला व सेवा पुरवत आहे.

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा मिळाव्यात, अभ्यासक्रमानुसार सराव करता यावा यासाठी त्यांनी "परीक्षा पोर्टल" या मोबाइल व वेब ॲपची निर्मिती केली आहे. आज अनेक विद्यार्थी या ॲपचा लाभ घेत असून, त्याचा उपयोग दैनिक सराव, डेली टेस्ट्स, स्टडी मटेरियल आणि निकाल व्यवस्थापनासाठी केला जातो.

"बी. दि. चेंज फाउंडेशन" तर्फे, दिनांक २९ जून २०२५ रोजी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये राज्यभरातील गुणवंत, होतकरू व उपक्रमशील शिक्षकांचा सन्मान करण्यात येणार आहे. आपल्या हस्ते या शिक्षकांचा गौरव होणे, हे आम्हा सर्वांसाठी गौरवाची बाब ठरेल.

आजच्या विद्यार्थ्यांनी उद्याचे नेतृत्व सक्षमपणे करावे, याकरिता शिक्षक हेच खरे शिल्पकार आहेत. आपल्या राज्यात अनेक शिक्षक निस्वार्थ भावनेने, समर्पित वृत्तीने आणि नवोन्मेषी पद्धतीने कार्यरत आहेत. परंतु असे अनेक शिक्षक शासनाच्या वा अन्य संस्थांच्या पुरस्कारांपासून वंचित राहतात. त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा, हेच या पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

शिक्षण क्षेत्रात काम करत असताना, आपले खरं कार्य करूनही पुरस्कारांपासून वंचित राहिलेल्या शिक्षक बांधवांना योग्य सन्मान मिळावा, ही भावना त्यांना सतत प्रेरणा देत असते. शिक्षणाचा खरा उद्देश विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणे आणि शिक्षकांच्या कार्याला गौरव मिळवून देणे, हेच त्यांच्या कार्याचे मूलमंत्र आहे.

मा. अभिषेक तुपे सर

उपाध्यक्ष, राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६

मा. अभिषेक तुपे सर हे राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६ चे उपाध्यक्ष असून, शिक्षण क्षेत्रातील संघर्षशील आणि प्रेरणादायी वाटचालीचे ते साक्षीदार आहेत. शिक्षक परिवारात जन्म घेतलेल्या तुपे सरांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनात सक्रिय विद्यार्थी चळवळीमध्ये काम करत असताना समाजातील शिक्षक वर्गाचे कार्य, त्यांचा संघर्ष आणि निःस्वार्थी योगदान जवळून अनुभवले.

"चांगल्या गुरूशिवाय कोणताही विद्यार्थी उत्तम प्रकारे घडू शकत नाही," या तत्वावर विश्वास ठेवत, त्यांनी शिक्षकांना केवळ अध्यापनापुरते मर्यादित न ठेवता समाजघडणीतील त्यांच्या मोलाच्या योगदानाची दखल घेण्याचा संकल्प केला. अनेक पिढ्यांपासून आपल्या स्वार्थाचा विचार न करता समाजात आदर्श व्यक्तिमत्व निर्माण करणाऱ्या गुरुजनांचा यथोचित सन्मान व्हावा, या उद्देशाने त्यांनी राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५ या उपक्रमाचे आयोजन केले आहे.

तुपे सरांचा हा उपक्रम म्हणजे शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्रत्येक शिक्षकासाठी एक प्रेरणास्थान आहे, जो त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करतो आणि समाजात शिक्षकांना योग्य प्रतिष्ठा मिळवून देण्याचे कार्य करतो.

मा. अभिषेक तुपे सर
उपाध्यक्ष

कार्यालयीन पत्ता

बी . द. चेंज फाउंडेशन ( रजि. महा. २२०/२२)

दूसरा मजला, जानकी प्लाझा, भगवान महावीर पथ कोपरगाव,
ता. कोपरगाव, जि. अहमदनगर, पिन कोड - ४२३६०१
+91 8796696960
+91 9370255617
shikshakpuraskar2025@gmail.com
bethechange.org.in